Marathi Katha Logo
मराठी कथाPro

वक्ता आणि श्रोते Vakta and Shrota Marathi Katha

एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती.

लेखक: Rohit
स्वर: रोहित म्हात्रे
3 मिनिटे वाचन
२१ ऑगस्ट, २०२६
12 वाचले
🎧 ऑडिओ कथा ऐका

वक्ता आणि श्रोते Vakta and Shrota Marathi Katha

स्वर: रोहित म्हात्रे
00:0002:35
बॅकग्राउंड ऑडिओ: स्क्रीन बंद असताना अखंड ऐकण्यासाठी ॲप वापरा.
App मध्ये ऐका
वक्ता आणि श्रोते  Vakta and Shrota Marathi Katha

एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली.



कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला,’एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.”

बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,” अहो वक्ते महाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.”



वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,”देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही त्‍याच्‍यात होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.”



श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,” ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल” वक्‍त्‍याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले.



तात्‍पर्य :- काहीवेळेस आपल्‍या चांगल्या व देशहिताच्‍या योजना लोकांच्‍या गळी उतरविण्‍यासाठी युक्तीप्रयु‍क्तीचा वापर करावाच लागतो.


फॉन्ट आकार:A
MarathiKatha Android App

तुम्हाला ही कथा आवडली का?

MarathiKatha App मध्ये अशाच शेकडो प्रेरणादायी, बोधप्रद आणि ऐतिहासिक कथा विनामूल्य वाचा आणि HD ऑडिओमध्ये ऐका!

तुम्हाला हेही आवडेल

बोधकथा श्रेणीतील आणखी सुंदर कथा

आणखी पहा →
शेवटची पणती
बोधकथा
ऑडिओ

शेवटची पणती

देवगावात गणू नावाचा एक गरीब कुंभार राहत होता. त्याचं छोटंसं घर, मातीची भांडी बनवण्याचं काम आणि घरात त्याची पत्नी आणि दहा वर्षांचा मुलगा—माधव. गणू दिवसभर मेहनत करून माठ, पणत्या, दिवे आणि कुंड्या बनवायचा. बाजारात त्याची भांडी विकली की घरचा संसार कसाबसा चालायचा.

8 मिनिटे वाचन
2 वाचले
कोकणातली ती रात्र
बोधकथा
ऑडिओ

कोकणातली ती रात्र

पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातला पाऊस म्हणजे जणू आभाळ फाटल्यासारखा कोसळतो. समीर आपल्या गाडीने रत्नागिरीच्या पुढच्या एका निर्जन गावाकडे निघाला होता. त्याच्या आजोबांचे निधन होऊन अनेक वर्षे झाली होती आणि त्यांचा जुना वाडा तसाच पडून होता. तो वाडा विकण्याचा निर्णय समीरने घेतला होता, पण त्याआधी एकदा वाड्याची पाहणी करणे गरजेचे होते.

6 मिनिटे वाचन
14 वाचले
पारधी व कबूतर मराठी गोष्ट
बोधकथा
ऑडिओ

पारधी व कबूतर मराठी गोष्ट

एका गावाच्या हद्दीबाहेर एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर बरेच पक्षी घरटे बांधून राहात होते. तिकडून येणारे जाणारे लोकसुद्धा त्या वडाच्या सावलीत बसून विश्रांती घेत होते.

5 मिनिटे वाचन
5 वाचले